Tuesday, July 21, 2026

Nashik : 'त्या' दिवसाची धास्ती ! रविवारी भावली धरणाकडे अनेक पर्यटकांची पाठ

Nashik : 'त्या' दिवसाची धास्ती ! रविवारी भावली धरणाकडे अनेक पर्यटकांची पाठ

Nashik : इगतपुरी (Igatpuri) येथील निसर्गरम्य भावली धरण (Bhavli Dam) सध्या पोलीस बंदोबस्ताने वेढले गेले आहे. रविवारी (दि. १२) नाशिकरोड (Nashik Road) येथील एका पर्यटक (Tourist) कुटुंबासोबत घडलेल्या गंभीर प्रकरणानंतर रविवारी (दि. १९) भावली धरणावर पर्यटकांची गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळाले. पर्यटन स्थळावर अशाप्रकारे पर्यटकांसोबत झालेल्या गंभीर प्रकारामुळे इतर पर्यटकांच्याही मनात धास्ती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता ग्रामीण पोलीस पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत.

पर्यटन स्थळांवर २४ तास गस्त

​पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांच्या आदेशाने इगतपुरी पोलिसांनी सुटीच्या दिवशी भावली धरणासह तालुक्यातील इतर गर्दीच्या पर्यटन स्थळांवर २४ तास गस्त आणि नाकेबंदी केली. ​रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने इगतपुरीचे पोलीस निरीक्षक श्याम बलप आणि अमलदारांचे पथक भावली धरणाच्या (Dam) मुख्य मार्गावर आणि परिसरात तैनात होते. पोलिसांनी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर ‘फिक्स पॉईंट’ उभारून प्रत्येक संशयास्पद वाहनाची कसून तपासणी केली.

हुल्लडबाजांना दंडुक्याचा ‘प्रसाद’

दरम्यान, यावेळी ​पर्यटन स्थळांसह रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या आणि महिलांची छेड काढणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत शांतता भंग करणाऱ्या काही तरुणांना दंडुक्याचा ‘प्रसाद’ देत सक्त ताकीद दिली. पोलिसांच्या या पवित्र्यामुळे रविवारी धरणावर कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, गेल्या आठवड्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी गर्दी करणाऱ्या पर्यटकांचा ओढा या रविवारी घटल्याचे प्रकर्षाने जाणवले.

नेमकं काय घडलं होतं ?

नाशिक शहरातील एक कुटुंब रविवारी ८ सदस्यांसह इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील भावली धरणावर (Bhavli Dam) फिरण्यासाठी गेलं होतं. फिरून झाल्यानंतर घरी परतत असताना कुटुंबातील एका महिलेची दोन टवाळखोरांनी छेड काढली. या प्रकारावर संतापलेल्या त्यांच्या पतीने आक्षेप घेत, “सार्वजनिक ठिकाणी असे वागणे योग्य आहे का?” असा जाब विचारला. यावरून टवाळखोरांनी वाद कुटूंबीयांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली धक्कादायक म्हणजे वार घालत थेट अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न हुल्लडबाजांनी केला. कित्येक किलोमीटर त्यांचा पाठलाग केला सोबतच त्यांना मारहाणही करण्यात आली.

संपर्क करा

भावलीसह जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर पाेलीस ठाणेनिहाय गस्त व बंदाेबस्त तैनात आहे. संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष गस्त सुरु असून, नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय पर्यटनाचा आनंद घ्यावा आणि आपत्कालीन स्थितीत ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा असे आवाहन नाशिकचे पाेलीस अधिक्षक डाॅ. डी. एस. स्वामी यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >