Friday, July 10, 2026

Nashik Crime : नाशिकच्या पंडित कॉलनीत कोयत्याची दहशत ! परिसरात खळबळ

Nashik Crime :  नाशिकच्या पंडित कॉलनीत कोयत्याची दहशत ! परिसरात खळबळ

Nashik Crime : नाशिकच्या उच्चभ्रू आणि सुसंस्कृत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंडित कॉलनीत भररस्त्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलांमधील किरकोळ वाद क्षणार्धात हिंसक वळणावर गेला आणि एका तरुणाने चक्क हातात कोयता घेऊन हल्ला केल्याची घटना पंडित कॉलनीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. काही क्षणांतच तो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर शहरभर या घटनेची चर्चा सुरू झाली. भररस्त्यात शस्त्रांचे प्रदर्शन होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी निर्धास्तपणे रस्त्यावर वावरायचे कसे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून संबंधितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. व्हिडिओतील व्यक्तींची भूमिका, घटनेमागील कारणे आणि नेमका घटनाक्रम काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही महिन्यांत नाशिकमध्ये कोयते, तलवारी आणि इतर धारदार शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा सातत्याने होत आहे. त्यामुळे ही घटना केवळ एक वेगळी घटना म्हणून न पाहता, वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा इशारा म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

ठाकरे गटातील १० ते १२ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?

दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, शिवसेना ठाकरे गटासाठी नाशिकमधून मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याच्या चर्चांदरम्यान आता नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे अनेक नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

नाशिक महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विकासनिधी मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे. हीच बाब केंद्रस्थानी ठेवून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाकरे गटाच्या १५ पैकी १० ते १२ नगरसेवकांशी संपर्क साधल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे हे लोकप्रतिनिधी लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

यासंदर्भात शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत संबंधित नगरसेवकांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या बैठकीला किंवा संभाव्य पक्षप्रवेशाला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. दरम्यान, संबंधित नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा विशेष निधी दिला जाणार असल्याचीही चर्चा आहे. या संपूर्ण राजकीय हालचालीला काही वर्तुळांत 'ऑपरेशन टायगर' असे नाव दिले जात असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, चर्चेचे प्रत्यक्ष पक्षप्रवेशात रूपांतर होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा