मनमाड : मनमाड शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकावर मोटार वाहन कायद्यानुसार चलनाची कारवाई करण्यात आल्यानंतर संबंधित वाहनचालकाने संतापाच्या भरात रस्त्याच्या मध्यभागी वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत मोठा गोंधळ घातल्याची घटना गुरुवारी दुपारी रेल्वे ब्रिज परिसरात घडली. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. विजय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक अभिषेक तानाजी आहेर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भारत निवृत्ती भवाळ तसेच चालक किरण वैद्य हे वाहतूक नियमांची अंमलबजावणी करत असताना संबंधित वाहनचालकावर मोटार वाहन कायद्यानुसार चलनाची कारवाई करण्यात आली होती.
मात्र, कारवाईचा राग मनात धरून संबंधित वाहनचालकाने रेल्वे ब्रिजवरील रस्त्याच्या मध्यभागी वाहन उभे केले. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी वाद घालत दादागिरी केली, शिवीगाळ केली तसेच सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने इतर वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच मनमाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली तसेच संबंधित वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
विश्वचषकाच्या मैदानात सध्या 'रेड कार्ड'चा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. अमेरिकेचा स्टार स्ट्रायकर फालोरिन बालोगुन याला मिळालेल्या एका वादग्रस्त रेड ...
संबंधित वाहनचालकावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक सेवकाच्या कर्तव्यात अडथळा आणणे, सरकारी कामात हस्तक्षेप करणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम व इतर लागू कायद्यांतील संबंधित तरतुदींनुसार संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई : देशातील सरकारी आणि खासगी क्षेत्रातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees' Provident Fund Organisation - (EPFO)) आजपासून ...
वाहतूक नियमांचे पालन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी
मोटार वाहन कायद्याअंतर्गत करण्यात येणारी कारवाई ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केली जाते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे ही परिवहन विभागाची वैधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे चलनाची कारवाई झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा; कायदा हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून अशा कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
व्हेनेझुएला : भूकंपामुळे (Earthquake) कोसळलेल्या नऊ मजली इमारतीच्या (Nine-storey Building) ढिगाऱ्याखाली तब्बल आठ दिवस अडकूनही एका व्यक्तीने मृत्यूवर मात केली. ही थरारक ...
जनतेस आवाहन
परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मोटार वाहन कायद्याचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळावे, वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत, वाहन चालविताना शिस्त राखावी आणि प्रशासनाच्या कारवाईस सहकार्य करावे. सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदार भूमिका बजावणे ही काळाची गरज आहे.




