मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना सोमवारी पुन्हा बळ मिळाले. 'उबाठा' गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'नंदनवन'वर ही भेट पार पडली. मतदारसंघातील विकासकामांसाठी आणि प्रलंबित निधीसाठी ही भेट असल्याचे स्पष्टीकरण खासदार आष्टीकर यांनी दिले असले, तरी या घडामोडीमुळे ठाकरे गटाच्या गोटात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ठाणे : शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेतील शिवसेना ...
'उबाठा'चे जवळपास सात खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार संजय दिना पाटील यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती, तर परभणीचे खासदार संजय जाधव हेदेखील ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच आता आष्टीकर यांनी 'नंदनवन' गाठल्याने 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा अधिक गतिमान झाली आहे.
राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांना गती देण्यात येत असून या यंत्रणा ...
नागेश पाटील आष्टीकर हे महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी आष्टीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना स्वतः फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. विरोधी बाकावरील खासदाराला थेट देशाच्या गृहमंत्र्यांचा फोन आल्यामुळे ते महायुतीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी तेव्हाच जोर धरला होता. त्यानंतर परिस्थिती सावरण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनीही आष्टीकर यांना फोन करून चाचपणी केली होती. मात्र, आता थेट एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी झालेली ही प्रत्यक्ष भेट ठाकरे गटाची डोकेदुखी वाढवणारी ठरली आहे.
मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी ...
एकीकडे खासदारांच्या भेटीगाठी सुरू असताना, दुसरीकडे 'उबाठा' गटाला मुंबईत खिंडार पडले आहे. उबाठा गटाचे नेते अनिल परब यांचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जाणारे प्रभाग क्रमांक ९२ चे शाखाप्रमुख रामशरण चांदेलिया यांनी आपल्या ५०० हून अधिक कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदेलिया यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे वांद्रे आणि कलिना परिसरातील स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली आहे.





