नाशिक : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) येथे स्त्रीबीज तस्करी प्रकरणी ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पालिकेने मुंबई नाका येथील मालती आयव्हीएफ सेंटर सील केले होते. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी (दि. १२) रोजी मुंबईतील आरोग्य भवनात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी महापालिकेचे वैद्यकीय पथक जाणार असून, यावेळी पथकाकडून नाशिकमधील मालती सेंटरची माहिती सुनावणीदरम्यान सादर करण्यात येणार आहे.
मुंबई : केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अर्थात National Pension System (NPS) अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्याची तयारी ...
बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरणातील नाशिकशी संबंधित धागेदोरे तपासण्यासाठी यापूर्वी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे पथक बदलापूर येथे जाणार होते. मात्र, विविध कारणांमुळे वैद्यकीय विभागाचा दौरा लांबणीवर पडत होता. आता मात्र स्त्रीबीज प्रकरणी मुंबईतील आरोग्य भवनात सुनावणी होणार आहे. यासाठी नाशिक मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर उपस्थित राहणार आहेत. वैद्यकीय विभागाने मालती आयव्हीएफ केंद्रातून वादग्रस्त कागदपत्रे ताब्यात घेतली असून, या केंद्राची नोंदणी रद्द केली आहे.
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा अक्षरशः 40 अंशाच्या पुढे गेल्याने अनेक जिल्हे होरपळले आहेत. अशातच आज ...
या प्रकरणात नाशिक कनेक्शनही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मालती आयव्हीएफ केंद्राचा या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले होते. या केंद्राला नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नोंदणी प्रमाणपत्र दिले होते. नाशिकमधील या केंद्रामार्फत बदलापूर येथे स्त्रीबीज तस्करी केली जात असल्याचे तपासातून समोर आले आहे. बदलापूर प्रकरणातील मालती आयव्हीएफ केंद्राची नोंदणी नाशिकमध्ये असल्याने संबंधितांकडून शहरातही अशा प्रकारची स्त्रीबीज तस्करी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.






