मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ (Big boss Marathi 6) यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार ? याची उत्सुकता प्रचंड वाढलीय. 'बिग बॉस मराठी ६'चा वीकेंड अर्थात भाऊचा धक्का म्हटलं की घरातील सदस्य बाहेर जाणार. बिग बॉस आता शेवटच्या टप्प्यात असताना घराबाहेर पडणाऱ्या त्या सदस्याचं नाव समोर आलं आहे.
बिग बॉसच्या घरात आता एकूण ८ सदस्य आहेत. यामध्ये रेवा कौरासे, राखी सावंत, तन्वी कोलते, अनुश्री माने, राकेश बापट, सागर कारांडे, दिपाली सय्यद, विशाल कोटियन यांचा समावेश आहे. यापैकी सागर, राखी, राकेश, अनुश्री, रेवा आणि विशाल हे सदस्य नॉमिनेट आहेत.
या आठवड्यात रेवा कॅप्टन झाली, त्यामुळे ती सेफ आहे. त्यानंतर राखीच्या नावाची चर्चा होती. पण राखीही नाही. मग बिग बॉसच्या घरातून कोण एलिमिनेट झालं ? तर बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात बाहेर पडणारा सदस्य सागर कारंडे आहे. अनेकांनी सागरला सीझनमध्ये ट्रोल केलं आणि त्याला घरातून बाहेर काढण्याची मागणी सतत होत होती.
सागर घराबाहेर गेल्याचं समजताच प्रेक्षकांनी फायनली गेला, बरं झालं, सगळ्यात बेस्ट एव्हिक्शन अशा कमेंट केल्या आहेत. सागरला ३ वर्षांपासून बिग बॉसचं आमंत्रण मिळत होतं, यावेळी त्यानं ते स्वीकारलं. पहिल्याच आठवड्यात रितेशनं त्याचा खेळ टॉप क्लास असल्याचं म्हणत कौतुक केलं होतं.
रितेशनं एंटरटेनमेंटचे नवे फंडे, नाटकाप्रमाणेच घराचा खेळ 'हाऊसफुल्ल' असं म्हणत सागरच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. तेव्हा सागर भावुक झाला होता. सागर कारंडे एलिमिनेट झाल्यानंतर बेस्ट एव्हिक्शन असं म्हणत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.






