Tuesday, March 24, 2026

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात येतात. दि. १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीतील होणाऱ्या या पूजांची ऑनलाईन नोंदणी दि. २५ मार्च रोजी सकाळी ११ पासून सुरू होत असल्याची माहिती मंदिर समितीने दिली.

भाविकांना पूजेची नोंदणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.दि. ७ ऑक्टोबर २०२४ पासून श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा टप्प्याटप्प्याने ऑनलाईन नोंदणीद्वारे भाविकांना उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतील भाविकांचा पूजेच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील टप्प्यात दि. १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व महानैवेद्य सहभाग योजना तसेच एप्रिलमधील तुळशी अर्चन पूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नोंदणीसाठी अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. अधिक माहिती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच समितीच्या दूरध्वनीवर भाविकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा