Friday, March 20, 2026

अमेरिकेच्या लढाऊ विमानांना जागा देण्यास श्रीलंकेचा नकार

अमेरिकेच्या लढाऊ विमानांना जागा देण्यास श्रीलंकेचा नकार

कोलंबो : मध्य पूर्वेतील युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझवरील तेल वाहतुकीला फटका बसला आहे. होर्मुझ मार्ग सुरळीत करण्यासाठी अमेरिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु ट्रम्प यांना हवं तसे यश मिळत नाही. या युद्धात श्रीलंकेने अमेरिकन लढाऊ विमानांना त्यांच्या जमिनीवर उतरवण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या दक्षिण पूर्वेकडील मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेला २ लढाऊ विमाने उतरवायची होती. परंतु राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायके यांनी अमेरिकेची ही मागणी धुडकावली.

शुक्रवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती यांनी संसदेत ही घोषणा केली. संसदेत राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके म्हणाले की,जिबूतीहून आलेल्या दोन अमेरिकी लढाऊ विमानांनी ४ आणि ८ मार्च रोजी श्रीलंकेत उतरण्याची परवानगी मागितली. मात्र दोन्ही विनंत्या नाकारण्यात आल्या. अनेक दबावानंतरही आम्ही तटस्थ भूमिका कायम ठेवली. आम्ही झुकणार नाही. मध्य पूर्वेतील युद्धामुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. परंतु तटस्थ भूमिका कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रयत्न करू असं त्यांनी सांगितले. अमेरिकेला जिबूतीमधील एका तळावरून आठ अँटीशिपविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली दोन लढाऊ विमाने मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणायची होती, पण श्रीलंकेने स्पष्टपणे नकार दिला

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >