Saturday, March 7, 2026

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत मार्ग.

विमानतळ विकास : नवी मुंबई विमानतळाचा दुसरा टप्पा, पुरंदर विमानतळासाठी विशेष निधी आणि राज्यातील इतर विमानतळांच्या विस्तारासाठी निधी. कनेक्टिव्हिटी : राज्यातील मेट्रो नेटवर्क १ हजार २०० किमीवर, तर द्रुतगती मार्गांचे जाळे ६ हजार किमीवर नेण्याचे उद्दिष्ट. कल्याण ते लातूर आणि शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग उभारले जाणार आहेत.

महत्त्वाच्या घोषणा

- उत्तन ते विरार सागरी सेतू ५८,७५४ कोटी रुपये खर्चून मुंबई ते वाढवण बंदर जोडणार. - बाळकुम ते गायमुख आणि उलवे किनारी मार्ग. अटलसेतूला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडणार. - ऑरेंज गेट (पूर्व मुक्त मार्ग) ते मरीन ड्राईव्ह, गोरेगाव-मुलुंड, ठाणे ते बोरीवली, आणि खारघर ते तुर्भे भुयारी मार्ग . गायमुख जंक्शन ते फाऊंटेन हॉटेल ते भाईंदर (६ आणि ९ किमी लांबीचे मार्ग). वांद्रे-वरळी सागरी सेतू ते हायस्पीड रेल्वेस्थानक (बीकेसी) ते मुंबई विमानतळ.

ग्रामीण रस्त्यांसाठी भरीव निधी

महाराष्ट्र अमृतकाल योजना : ६ हजार २७२ किमी द्रुतगती मार्ग आणि १४ हजार ९१९ किमीचे राज्य/जिल्हा मार्ग. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (टप्पा-३) : २३ हजार किमीचे रस्ते. काँक्रिटीकरण : १ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे काँक्रिट रस्त्यांनी जोडणार (४ हजार ५०० कोटी). पर्यटन परिरथ : ५००० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वस्त्यांना ४ हजार २४७ किमीच्या 'पर्यटन मार्गा'ने जोडणार.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >