Friday, January 9, 2026

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांऐवजी पक्षाच्या शाखांना भेटी देण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गुरुवारी (दि. ८) सायंकाळी ५ वाजता ठाण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या पक्ष कार्यालय आणि शाखेला भेट देणार आहेत.

ठाणे महापालिका निवडणुकीत मनसे-शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीची (शरद पवार गट) आघाडी आहे. महापालिका निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर ठाणे महापालिका निवणूक चर्चेत आली. मनसेने ठाण्यात २८ मराठी उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. या उमेदवारांना व्यक्तीशः भेटण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात येत आहेत. गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून राज ठाकरे यांची शाखा भेट सुरू होणार, असल्याची माहिती मनसेने दिली.

  •  प्रभाग क्रमांक १९ - मनसे उमेदवार प्रमिला विकास मोरे इंटरनिटी मॉल, तीन हात नाका, ठाणे.
  •  प्रभाग क्रमांक १७ - मनसे उमेदवार पूजा किरण ढमाळ किसन नगर नाका ठाणे.
  •  प्रभाग क्रमांक १६ - मनसे उमेदवार रश्मी राजहंस सावंत आणि मनसे उमेदवार आरती रोशन पाटील, आयटीआय चौक, वागळे इस्टेट.
  •  प्रभाग क्रमांक १५ - मनसे उमेदवार पवन पडवळ, साठे नगर नाका, वागळे इस्टेट.
  •  प्रभाग क्रमांक ०७ - मनसे उमेदवार स्वप्नाली खामकर-पाचंगे, पक्ष कार्यालय साईबाबा मंदिर जवळ, वर्तक नगर नाका.
  •  प्रभाग क्रमांक ०५ - मनसे उमेदवार पुष्कराज विचारे, पक्ष कार्यालय श्री समर्थ सोसायटी गजानन महाराज मंदिर रोड, शिवाई नगर, ठाणे.

Comments
Add Comment