कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना जून २००५ मध्ये करण्यात आली. कामोठे वसाहतीतील व ग्रामीण वसाहतीतील विद्यार्थ्यांना माफक फीमध्ये शिक्षणाची उत्तम सुविधा देणे हे उद्दिष्ट्य उराशी बाळगून संस्थेचे संस्थापक दिलीप पाटील साहेबांनी ही शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
सुरुवातीला मराठी माध्यमाचे छोटा शिशू ते दहावी इंग्रजी माध्यमाचे नर्सरी ते दहावी वर्ग चालू करण्यात आले. कालांतराने मराठी व इंग्रजीबरोबर सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले. या शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिस्त, सुसंस्कार व शिक्षण या संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे सुसंस्कारीत व सशक्त बनवून शिक्षित केले व करीत आहोत.
उत्तम िशक्षण व पालकांचा उत्तम प्रतिसाद यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना झाली. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांमधून विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न अलौकिक ठरला. हे सर्व शिक्षणाचे अविरत कार्य सुरू असताना "एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत" आदिवासी मुलांसाठी आदिवासी नामांकित शाळा सुरू करण्यात आली. अतिशय गरीब व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याचा शासनाचा उपक्रम आम्ही यशस्वीपणे राबवीत आहोत.
नामांकित इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा शैक्षणिक वर्षे २०१६-१७ पासून सुरू केली. या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता १ली ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध आहे.
२०१६ साली नामांकित इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा सुरू केल्यापासून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. सुरुवातीला शाळा सुरू केली तेव्हा शाळेत ७५ विद्यार्थी होते. सध्याच्या स्थितीला ४८७ विद्यार्थी शाळेत प्रवेशित आहेत. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, निवास, उत्तम राहण्याची व्यवस्था, उत्तम भोजन या सुविधा उपलब्ध आहेत.
या शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थी आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 'जव्हार, डहाणू, पेण व घोडेगाव या प्रकल्पाचा हा उपक्रम नामांकित इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज' कामोठे येथे यशस्वीपणे कार्यरत आहे.
शाळेची आव्हाने वास्तवात आणण्यासाठी, त्यांना मूर्त स्वरूप देण्यासाठी व त्यातून शाळेचा उत्कर्ष साधण्यासाठी अविरतपणे कार्य करत असणारे संस्थेचे संस्थापक दिलीप पाटील साहेब यांचे मोलाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता यावे म्हणून सुसज्ज विद्यालयाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये प्रशस्त संगणक कक्ष, प्रयोगशाळा ग्रंथालय, क्रीडांगण, सेमिनार हॉल व ई-लर्निंगची उत्तम सोय करण्यात आली आणि याचीच पोहोचपावती की काय, म्हणून मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, इ. १० वी व १२ वीचा निकाल मागील सलग पाच वर्षं १०० टक्के इतका लागत आहे. रंगोत्सव सेलिब्रेशन ऑफ नॅशनल व इंटरनॅशनल लेव्हल चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थी नेहमीच अग्रस्थानी आहेत.
शासनाचे विविध नियमांचे पालन करून R.T.E विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुद्धा होत आहे. तसेच जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत किंवा परिस्थितीअभावी शिक्षण घेता येत नाही. अशा दरवर्षी २५ ते ३० विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण आपल्या संस्थेमार्फत चालू आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते.
विविध शैक्षणिक उपक्रम संस्थेतर्फे विद्यालयातर्फे घेतले जातात. जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा त्यामागचा हेतू सफल होईल. त्याचप्रमाणे दरवर्षी कला, क्रीडा, सांस्कृतिक कामोठे या महोत्सवात विविध प्रकारचे ४० खेळांचे आयोजन केले जाते. जेणेकरून कामोठे पंचकृषीतील अनेक खेळाडू व विद्यार्थी या महोत्सवात सामील होतात. कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विकास व्हावा यासाठी सालाबादप्रमाणे संस्थेमार्फत कामोठे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये फक्त आपल्याच विद्यार्थ्यांचा नाही, तर नवी मुंबईच्या इतर शाळांचाही उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभतो.
विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व जाण्यासाठी बसची सुविधा आहे. त्यामुळे विद्यार्थी दूरहूनसुद्धा शाळेत बसच्या माध्यमातून येऊन शिक्षण घेतात. या आपल्या संस्थेमध्ये एकूण ५५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शालेय वाटचाल करत असताना सामाजिक भान म्हणून नोकरी करणाऱ्या महिलांना किंवा परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या महिलांसाठी S.N.D.T महिला मुक्त विद्यापीठ हे अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यालाच जोड म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र सुद्धा सुरू केले गेले. जेणेकरून महिलांबरोबर पुरुषांनाही आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्णत्वास नेता येईल.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सुषमा पाटील सीनिअर नाईट कॉलेजच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केली. त्यात िवद्यापीठ स्तरावर िद्वतीय क्रमांक पटकावला. तसेच लांब उडी, भाला फेक, १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आमच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक घेऊन विद्यापीठ स्तरावर क्रीडा महोत्सवात भाग घेतला व कॉलेजचे प्रतिनिधित्व केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना दिवसा नोकरी करून आपले डिग्रीचे शिक्षण पूर्ण करायचे असेल, तर त्यांच्यासाठी मुंबईविद्यापीठाचे (रात्रशाळा) नाईट कॉलेज सुरू करण्यात आले. सुषमा पाटील सीनिअर नाईट कॉलेज कामोठे हे आमचे युनिट १५ सप्टेंबर २०२१ रोजी कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्थेअंतर्गत सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्रात अटल करंडक (नाट्यक्षेत्र) स्पर्धा जोरात सुरू आहे. आमच्या महािवद्यालयात अटल करंडक एकांकिका स्पर्धेत सलग दोन वर्षं सहभाग घेऊन उत्साह कायम राखला आहे.
िवद्यार्थ्यांचा सर्वांगीण िवकास व्हावा यासाठी शैक्षणिक वर्षभरात अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये िवज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, िचत्रकला, वत्कृत्व स्पर्धा, स्नेह संमेलन व M.T.S., N.T.S., स्कॉलरशिप व ऑलिम्पियाड स्पर्धेचादेखील यामध्ये समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील युनिफाईड, किक बॉक्सिंगमध्ये आपल्या िवद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवून आपल्या संस्थेचे नाव भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर उंचावले आहे आिण याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमचा िवद्यार्थी उद्योगशील, आत्मनिर्भर व वैज्ञानिक दृष्टिकोन असे आदर्श गुण आत्मसात करून देशाचा एक उत्तम नागरिक व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सदैव राहतील.






