Thursday, November 27, 2025

डोंबिवलीत किरकोळ वादातून पत्नीची हत्या, पती फरार

डोंबिवलीत किरकोळ वादातून पत्नीची हत्या, पती फरार

कल्याण : डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली असून आरोपी पती फरार आहे. मृत महिलेचे नाव ज्योती धाहीजे असे आहे. प्राथमिक माहितीनुसार पती–पत्नीमध्ये काल रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद चिघळताच आरोपी पोपट धाहीजे याने रागाच्या भरात गळा आवळल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर आरोपीने घरातून पळ काढला. मानपाडा पोलिस आरोपीच्या मागावर आहेत. सीसीटीव्ही फुटेज, संभाव्य ठिकाणे आणि परिचितांकडून माहिती घेणे सुरू आहे. घटनेचा तपास मानपाडा पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >