Thursday, November 20, 2025

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार  : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर मारण्याचा स्प्रे फवारल्याची घटना विरारच्या जेपी नगरमध्ये मंगळवारी रात्री घडली. या घटनेत स्प्रे फवारलेल्या व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला आहे. अर्नाळा सागरी पोलिसानी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून स्प्रे फवारणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

विरार पश्चिमेच्या जेपी नगर येथील १५ क्रमांकाच्या इमारतीमध्ये उमेश पवार (५७) राहत होते. त्यांच्यासमोर राहणाऱ्या कुंदा तुपेकर (४६) यांच्याशी त्यांचा पाणी भरण्यावरून वाद होता. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या कुंदा यांनी मच्छर मारण्याचा स्प्रे उमेश पवार यांच्या तोंडावर मारला. त्यामुळे पवार हे बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अवघ्या दीड तासांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. कुंदा तुपेकर या पेशाने परिचारिका आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा प्रकार घडल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे.

या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी सदोस्य मनुष्यधाचा गुन्हा दाखल करून कुंदा तुपेकर यांना अटक केली आहे. अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. तसेच अनेक ठिकाणी नळाला कमी दाबाने पाणी येते. पाणी भरण्याच्या वेळेचा भंग किंवा जास्त भांडी भरण्यावरूळावन दररोज नर वादावादी होते. हे वाद कधी कधी इतके विकोपाला जातात की, शेजारी एकमेकांच्या अंगावर धावून ताजात. ज्यामुळे क्षुल्लक वादातून गंभीर घटना घडतात.

Comments
Add Comment