Monday, November 17, 2025

रायगड जिल्ह्यात नगरसेवक पदांसाठी ९०० उमेदवारी अर्ज

रायगड जिल्ह्यात  नगरसेवक पदांसाठी ९०० उमेदवारी अर्ज
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी (१७) रोजी शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदांसाठी एकुण ९०० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ५९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. खोपोलीत ३१ जागांसाठी नगरसेवक पदासाठी १८८, नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज, अलिबागमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७५, नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज, श्रीवर्धनमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ६८ व नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज, मुरुड-जंजिरामध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७४ अर्ज, नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज, रोह्यामध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७८ अर्ज, नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज, महाडमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७४, नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज. पेणमध्ये २४ जागांसाठी नगरसेवक पदासाठी १०३, नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज. उरणमध्ये २१ जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७८, नगराध्यक्ष पदासाठी नऊ अर्ज. कर्जतमध्ये २१ जागांसाठी नगरसेवक पदासाठी ९२, नगराध्यक्ष पदासाठी आठ अर्ज. माथेरानमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७०, नगराध्यक्ष पदासाठी चार अर्ज दाखल झाले आहेत.
Comments
Add Comment