नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळवल्या जातील. येत्या १४ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे, तर दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत खेळवला जाईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना वेळापत्रकानुसार कोलकाता येथे होईल. गुवाहाटीमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेत आता बदल करण्यात आला आहे. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी म्हटलं आहे की, गुवाहाटी हे ईशान्य भारतात आहे आणि हिवाळ्यात तिथे सूर्य लवकर उगवतो आणि मावळतो. या कारणामुळे दुसरा कसोटी सामना अर्धा तास लवकर सुरू होणार आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी सामन्याची नाणेफेक सकाळी ८.३० वाजता होईल आणि इतर सर्व दिवशी खेळ सकाळी ९ वाजता सुरू होईल.






