'मॅरिटाइम सीईओ फोरम'ला करणार संबोधित; १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. ते गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या 'इंडिया मॅरिटाइम वीक २०२५' मधील 'ग्लोबल मॅरिटाइम सीईओ फोरम'ला संबोधित करणार आहेत. 'मॅरिटाइम अमृत काल व्हिजन २०४७' शी सुसंगत असलेल्या सागरी बदलांच्या दिशेने पंतप्रधानांचे हे सहभाग मोठे पाऊल आहे.
ग्लोबल मॅरिटाइम सीईओ फोरम हा 'इंडिया मॅरिटाइम वीक २०२५' चा मुख्य कार्यक्रम आहे. यामध्ये जागतिक सागरी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मोठे गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत.
यावेळी सागरी क्षेत्रातील शाश्वत वाढ, पुरवठा साखळी, हरित शिपिंग आणि समावेशक ब्लू इकॉनॉमी यावर चर्चा होणार आहे. या परिषदेत १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे ६०० हून अधिक सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे.
या कार्यक्रमात 'मेरीटाईम शीईओ परिषद' आयोजित केली जाणार आहे, जी सागरी उद्योगातील महिला नेत्यांसाठी जगातील सर्वात मोठी परिषद आहे.






