Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी चिपळूणमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे माझे चांगले मित्र आहेत. या मैत्रीचा उपयोग या महामार्गाच्या कामाच्या पूर्णत्वासाठी करून घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

खा. नारायण राणे हे त्यांच्या जनता दरबारनिमित्त चिपळूणमध्ये आले होते. जनता दरबार संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी आदी उपस्थित होते.

खासदार राणे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना उबाठावर टीकेची झोड उठवली. यावेळी ते म्हणाले की, उबाठा सेनेतील नेत्यांना चांगले काही बोलता येते का? शुद्ध चांगले विचार देता येतात का? असा सवाल उपस्थित करीत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ३७० कलम बद्दल बोलायचे. ते कलम गृहमंत्री अमित शहा यांनी रद्द केले, अशा नेतृत्वावर तोंडात काही येते ते बोलतात, असे राणे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे सांगताना शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून ते शेतकऱ्यांना मदत करेल. कोकणातील पिकांच्या नुकसानीसंदर्भातही सर्वेक्षण सुरू आहे. याबाबत लवकरच शासन मदत जाहीर करेल, अशी ग्वाही नारायण राणे यांनी दिली. चिपळूण शहरातील लाल-निळ्या पूर रेषा संदर्भात आपला पाठपुरावा सुरू असून चिपळूणवासीयांना अपेक्षित असलेला लवकरच निर्णय येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >