मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर २३.३० ते ३ वाजेपर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर १.१५ ते ४.४५ वाजेपर्यंत ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार या ब्लॉक कालावधीत विरार आणि भाईंदर/ बोरिवली स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन दिशानिर्देशांमधील काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील.
या ब्लॉकची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्स यांच्याकडे उपलब्ध आहे. तसेच रविवारी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक असणार नाही.






