Wednesday, September 10, 2025

आर्यन शिरवळकरने सर केला माऊंट किलिमांजारो पर्वत

आर्यन शिरवळकरने सर केला माऊंट किलिमांजारो पर्वत

भारताचा तिरंगा जगातील सर्वात उंच शिखरावर

डोंबिवली : जगातील सर्वात उंच स्वतंत्र पर्वत व सात शिखरांपैकी एक उंच पर्वत आफ्रिका खंडातील व पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशातील माऊंट किलिमांजारो हा सर्वात उंच असलेला पर्वत डोंबिवलीतील तेवीस वर्षीय गिर्यारोहक आर्यन शिरवळकर या तरुणाने अवघ्या तेरा दिवसांच्या मोहीम अंतर्गत सर केला.

या पर्वताची उंची १९ हजार ३४१ फूट (५ हजार ८९५ मीटर) असून हा जगातील सर्वात उंच स्वतंत्र पर्वत आहे आणि सात शिखरांपैकी एक असलेल्या माऊंट किलिमांजारो पर्वत अवघ्या तेरा दिवसांच्या मोहीम अंतर्गत सर केला व भारताचा तिरंगा जगातील सर्वांत उंच शिखरावर रोवला आहे.गिर्यारोहक आर्यन डोंबिवलीतील आपल्या घरी परतताच त्याच्या इमारतीतील रहिवाशांना मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्याचे ढोल-ताशांच्या गजरात आंनदोत्सव साजरा केला.

माऊंट किलिमांजारो पर्वत सर करणारा डोंबिवलीतील पहिला गिर्यारोहक ठरल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी निवासी विभागातील पाम व्ह्यू. सोसायटीत राहणारा आर्यन अजित शिरवळकर या तेवीस वर्षीय तरुणाला लहानपणापासूनच निसर्गाची आवड असल्याने खडक, डोंगर, गड, किल्ले पर्वतावर चढण्याची त्याला आवड निर्माण झाल्याने आर्यन वयाच्या पंधराव्या वर्षांपासून आपली ही आवड जोपासायला लागला. गिर्यारोहणाचे प्रोपर प्रशिक्षण घेण्यासाठी मनाली येथून प्रशिक्षण घेतले.

त्या नंतर आर्यन याने वयाच्या सोळाव्या वर्षी पहिल्यांदा पतल सू माऊंटन १३ हजार ५०० फूट उंच सर केला. भारतातील हिमाचल, उत्तराखंड व अन्य राज्यातील ५० हून अधिक पर्वत गड किल्ले तसेच महाराष्ट्रातील ५०० हून अधिक ट्रेक्स त्याने केले आहेत. आर्यन, गेल्या ७ वर्षांहून अधिक काळ आऊटडोअर क्षेत्रात कार्यरत असून, त्याने भारतातील विविध निसर्गरम्य भागांमध्ये ४०० हून अधिक ट्रेक्स आणि अॅडव्हेंचर अनुभवांचे नेतृत्व केले आहे.

Comments
Add Comment