Thursday, January 15, 2026

पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बोब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वे मागरावरील ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी, पश्चिम रेल्वे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १५.३५पर्यंत पाच तासांचा जंबो ब्लॉक पाळणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानच्या सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे, काही अप आणि डाऊन लोकल गाड्या रद्द राहतील आणि चर्चगेटकडे जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे/दादर येथे शॉर्ट टर्मिनेटेड/रिव्हर्स केल्या जातील. या संदर्भात सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

Comments
Add Comment