Thursday, January 15, 2026

Rajkot Fire : राजकोटमधील इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

Rajkot Fire : राजकोटमधील इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

राजकोट : गुजरातच्या (Gujrat) राजकोट येथे अटलांटिस इमारतीला भीषण आग (Rajkot Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून इतर काही जण आगीत अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राजकोटमधील अटलांटिस इमारतीला भीषण आग लागली. इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडू लागताच, आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या, त्यानंतर सुमारे ५० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

दरम्यान, आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट्सचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही आग लागल्याचे कारण समोर आले नाही. परंतु, प्राथमिक तपासात ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >