कराड : नाना पटोले यांच्याकडे असलेली जबाबदारी काढून घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष केले. एवढे झाले तरी काँग्रेसमधली नाराजी कमी झाल्याचे दिसत नाही. आता कराडमध्ये काँग्रेसला धक्का बसण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर हे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर बलात्कार, चौघांचे निलंबन आणि २२ जणांची बदली
पुणे : स्वारगेट एसटी डेपोतील एका दिवे बंद असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू ...
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित कराड दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री समाधीस्थळी असताना काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर कोयना बँकेत पोहचले आहेत. ते अजित पवारांना भेटणार आहेत. अधिकृत कार्यक्रमानुसार समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर चहापानासाठी अजित पवार कोयना बँकेत येणार आहेत. या निमित्ताने अजित पवार आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यात चर्चा होणार आहे. यामुळे उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्याचे माजी सहकार मंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर सध्या काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथी गृह येथे अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट झाल्यापासूनच उदयसिंह पाटील उंडाळकर काँग्रेसचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जर धरू लागली आहे.