
बंगळूरू : कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसवर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत काळं फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे, तर या बसच्या चालकाला मारहाण करून कन्नड येतं का विचारत काळं फासलं आहे.ही घटना शुक्रवारी (२१ फेब्रुवारी ) रात्री पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली असून, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास अडवले.चालकास कन्नड येत का अशी विचारणा केली. कन्नड येत नसल्याचे सांगितल्यानंतर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चालकास एसटीतून खाली उतरवून त्याच्यावर जोरदार हल्ला केला आणि तोंडाला काळ फासत कन्नड येत नसेल तर कर्नाटकात येऊ देणार नाही अशी जोरदार घोषणाबाजी करू लागले. शिवाय एसटीला देखील काळं फासलं.त्यानंतर एसटी चालकाला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, या घटनेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अवघ्या एक रुपयांमध्ये महापालिकेच्या रुग्णांना मिळणार सोय मुंबई : कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी येथील एसआरए इमारत क्रमांक १ मधील दवाखान्यासाठी ...