Thursday, January 15, 2026

Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंतला सायबर सेलचे समन्स

Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंतला सायबर सेलचे समन्स

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत हिला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले असून २७ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. रणवीर अलाहाबादिया याला २४ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी ही माहिती दिली.

इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये आक्षेपार्ह विनोद केल्यामुळे यूट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्यासह समय रैना, अपूर्वा मुखिजा, आशीष चंचलानी आदींना महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले होतं. या प्रकरणात गुवाहाटी आणि मुंबई येथे २ गुन्हे दाखल झाले आहेत.

Comments
Add Comment