Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Bhutan King In Mahakumbh : भूतानच्या राजांचे त्रिवेणी संगमात स्नान

Bhutan King In Mahakumbh : भूतानच्या राजांचे त्रिवेणी संगमात स्नान

प्रयागराज : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज, मंगळवारी प्रयागराजला भेट दिली. याप्रसंगी महाकुंभाच्या निमित्ताने त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. यावेळी त्‍याच्‍यासमवेत उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ होते. दोघांनी गंगेची पूजा आणि आरती केली. यानंतर वांगचुक यांनी अक्षयवटचे दर्शन घेतले.

भूतानचे राजे वांगचूक लखनऊहून विमानाने बामरौली विमानतळावर पोहोचले. याठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्‍वागत केले. अरैल घाटावरून ते होडीने प्रयागराजमधील संगम घाटावर पोहोचले. येथील संगमात त्‍यांनी स्‍नान केले. यानंतर वांगचूक यांनी योगींसोबत पक्ष्यांना खायला दिले आणि त्यांचा फोटोही काढले. पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभाला भेट देतील. यानंतर हेलिपॅड, योगसेना रेल घाट आणि संगम येथील व्यवस्थेची पाहणी करतील.

दरम्‍यान, गेल्या १३ जानेवारीपासून आतापर्यंत ३७ कोटी लोकांनी पवित्र स्‍नान केले आहे. तर सोमवारी (३ फेब्रुवारी) वसंत पंचमीनिमित्त २ कोटी ३३ लाख लोकांनी महाकुंभात स्नान केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आगामी १० फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे भेट देणार आहेत.

Comments
Add Comment