Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीShivjayanti 2025 : शिवजयंती उत्सवानिमित्त ३ दिवस शिवनेरी येथील वाहतुकीत बदल!

Shivjayanti 2025 : शिवजयंती उत्सवानिमित्त ३ दिवस शिवनेरी येथील वाहतुकीत बदल!

पाहा कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?

पुणे : राज्यभरात शिवजयंती (Shivjayanti 2025) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी शोभयात्रेचे आयोजन करण्यात येत असून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशातच येत्या १९ फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवनेरी किल्ल्याजवळील (Shivneri Fort) वाहतुकीत काही बदल (Traffic Route Change) केले जाणार आहेत.

Virat Kohli : विराट कोहली पुन्हा होणार RCB चा कर्णधार? संघाकडून महत्त्वाचे विधान जाहीर

किल्ले शिवनेरी येथील शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २० फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत जुन्नर शहर व परिसरात काही मार्गावर एकेरी वाहतुकीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

आदेशानुसार नारायणगाव येथून जुन्नरकडे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा-खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल मार्गाने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड वाहनतळ या ठिकाणी जातील. ताथेड वाहनतळ ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज-सावरगाव-वारुळवाडी-नारायणगाव- घोडेगाव मार्गे जाईल.

गणेशखिंड- बनकफाटा- ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे माध्यमिक शाळा व आसपासच्या परिसरात असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण- अहिल्यानगर, नाशिक मार्गे जातील. आपटाळे – सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड वाहनतळ येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -