Friday, March 28, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेThane Malvani Mohtsv : ठाण्यात शुक्रवारपासून मालवणी महोत्सवाची धूम !

Thane Malvani Mohtsv : ठाण्यात शुक्रवारपासून मालवणी महोत्सवाची धूम !

ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवयास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे १० जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत “मालवणी महोत्सव-२०२५” चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा २६ वे वर्ष असून मालवणी मेजवानीसह दशावतारी नाटक, डबलबारी, आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे अविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत.

याशिवाय विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्यस्पर्धा आणि महिलावर्गासाठी “खेळ पैठणीचा”मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी १० दिवस महोत्सवात मिळणार आहे. अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्राम विकास मंडळ व ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शानिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोकणातील शेतकरीव्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कला – संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतूने गेली अनेक वर्षे सीताराम राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे आयोजन करतात.

Kokan MHADA : कोकण मंडळाच्या सदनिका नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

१० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याहस्ते या मालवणी महोत्सव – २०२५ चे उद्घाटन होणार आहे. १० दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपा नेते माजी मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आ.प्रविण दरेकर, आ.निरंजन डावखरे, आ.निलेश राणे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -