
मुंबई: शरद पवार यांचा मी सन्मान करतो. त्यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे, परंतु त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करणे, जनतेला कन्फ्युज करणे अयोग्य आहे. एक प्रकारे ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान आहे, अशी परखड टिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
राज्यात झालेला त्यांनी पराभव स्वीकारलं पाहिजे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्युज करण्यासाठी व आपलं अपयश लपवण्याचं काम ते करत असून, जनतेने तर विधानसभामध्ये दाखवून दिले म्हणून ईव्हीएम मशीनवर दोष देऊन पुन्हा आपलं अपयश लपवण्याचे पाप पवार करत आहेत.
Eknath Shinde : ईव्हीएमचं रडगाणं सोडून विकासाचं गाणं गा!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) निकालात महायुती (Mahayuti) सरकारला घवघवीत यश प्राप्त झालं ...