Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : ईव्हीएमचं रडगाणं सोडून विकासाचं गाणं गा!

Eknath Shinde : ईव्हीएमचं रडगाणं सोडून विकासाचं गाणं गा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) निकालात महायुती (Mahayuti) सरकारला घवघवीत यश प्राप्त झालं असून मुख्यमंत्री शपथविधी सोहळा देखील पार पडला आहे. सध्या महाराष्ट्रातील आमदारांचा शपथविधी सुरु आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यापासून अजूनही विरोधकांचे ईव्हीएम मशीनवरुन (EVM Machine) आरोप-प्रत्यारोप करणं सुरुच आहे. या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

Karnataka Marathi Mahamelava : बेळगावातील एकीकरण समितीचा महामेळाव्यात महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी!

निवडणुकीत जेव्हा महाविकास आघाडीच्या (MVA) बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम मशीन चांगल्या असतात. पण जेव्हा निकाल विरोधात लागतो तेव्हा मविआच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळ्याची ओरड सुरु होते. विरोधी पक्षाकडे आता मुद्दा राहिलेला नाही. जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. त्यामुळे आता त्यांनी ‘ईव्हीएमचे रडगाणे न गाता विकासाचे गाणे गायला पाहिजे’, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

त्याचबरोबर नाना पटोले २०० मतांनी जिंकले, रोहित पवार ११०० मतांनी जिंकले, मग काय म्हणायचं? कोणी काही करु शकतं का? संविधान आहे, लोकशाही आहे. जनमताचे स्वागत केले पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -