
मुंबई: कायदेशीर प्रस्तावांची तपासणी करण्याची प्रक्रिया, विधेयक व अध्यादेशाचा मसुदा तयार करणे तसेच दुय्यम विधी विधान तयार करणे याबाबतची माहिती राज्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी विधी विधान इंटर्नशिप उपक्रम २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे शासनाच्या कामकाजाची माहिती, विधेयके, अध्यादेश, नियम, अधिसूचनांचे प्रारूप तयार करण्याबाबतची कार्यपद्धती, विधान मंडळात विधेयके पारित करण्याची कार्यपद्धती, विधी व न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद, संविधानातील कायदेविषयक तरतुदी व त्यांचा प्रत्यक्ष वापर, विविध कायदे व तरतुदींची माहिती, विधी व न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामाचा प्रत्यक्ष अनुभव, विविध विषयांवर व्याख्याने तसेच संबंधित कार्यालयाना भेटी देण्याची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विधी महाविद्यालये व विद्यापीठे यामधील ५ वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाचे चौथ्या किंवा पाचव्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी, ३ वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी तसेच विधी पदव्युत्तर पदवीचे पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी या विधी विधान इंटर्नशिपसाठी पात्र आहेत. तथापि, या उपक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.नववर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुकीच्या तयारीची शक्यता पुणे : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ...