नववर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुकीच्या तयारीची शक्यता
पुणे : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत. ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचना यासंदर्भात न्यायालयात झालेल्या याचिकांमुळे या निवडणुकांना स्थगिती मिळालेली आहे. आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) निकालावर (Election Result) या निवडणुकांचे भवितव्य ठरणार होते. महायुती किंवा महाविकास आघाडी यांना काय कौल मिळतो, यावर या निवडणुका पुढील वर्षात होणार का, हेही ठरणार असल्याचे जवळपास निश्चित होते.
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड!
त्यानुसार महायुतीला राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात या तीनही पक्षांना पोषक वातावरण असल्याने पुढील सहा महिन्यांच्या आतच या निवडणुका (Municipality Election) घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनेक महापालिकांच्या प्रभागरचना आणि जिल्हा परिषद, पंचायती समिती यांच्या गट आणि गणरचना निश्चित झालेल्या आहेत. त्यामुळे आता त्यावर पुढची निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. ते लवकरच सुरू होईल, असे भाजपाच्या काही वरिष्ठ पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.
पुण्यात पुन्हा प्रभागरचना
पुणे महापालिकेतील तीन सदस्य प्रभागरचना यापूर्वी करण्यात आली आहे. मात्र, उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र महापालिका करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेसाठी पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. (Municipality Election)