Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीED Raid : ईडीचे माजी कर्मचारीही ईडीच्या रडारवर!

ED Raid : ईडीचे माजी कर्मचारीही ईडीच्या रडारवर!

५०० कोटींचा घोटाळा प्रकरणात वरिष्ठ आयआरएस अधिकारी ईडीच्या जाळ्यात

मुंबई : आतापर्यंत राजकीय नेते, मोठमोठे व्यापारी आणि अधिकारी ईडीच्या रडारवर होते. त्यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी केली जात होती. पण आता ईडीचेच माजी कर्मचारीही ईडीच्या रडावर आल्याचे दिसून येत आहे. ईडीने मंगळवारी रात्री सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर छापेमारी करत त्यांना अटक केली आहे. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

५०० कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीने सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सीबीआयने एफआयआर दाखल केली होती. सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करत होती. ईडीचाही तपास सुरू होता. त्यानंतर ईडीने काल त्यांच्या घरी छापेमारी केली. सावंत सध्या लखनौ येथे कस्टम आणि जीएसटी विभागात कार्यरत होते. तेथूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पदी असलेले सचिन सावंत यापूर्वी ईडी मुंबई झोन २ मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते. काही हिरे कंपन्यांद्वारे ५०० कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवल्या प्रकरणी ईडीमध्ये असताना त्यांनी चौकशी केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -