Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीSecurity breach in Loksabha : संसदेतल्या धूर प्रकरणात पाच जणांचा समावेश; एकजण...

Security breach in Loksabha : संसदेतल्या धूर प्रकरणात पाच जणांचा समावेश; एकजण निघाला लातूरचा

पाचही जण दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

नवी दिल्ली : संसदेत (Parliament) आज लोकसभेचं (Loksabha) कामकाज सुरु असताना दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारत स्मोक कँडल्स (Smoke candles) जाळून धूर केल्याने एकच गोंधळ उडाला. यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्याचवेळी संसदेच्या बाहेर तिघांनी कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या फोडून आंदोलन केले. यापैकी पाचही जणांना दिेल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक महिला आणि एका महाराष्ट्रातील तरुणाचाही समावेश आहे.

लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही ४२ वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर २५ वर्षीय अमोल शिंदे (Amol Shinde) हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे दोघंजण संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे कलर स्मोक घेऊन आंदोलन करत होते.

सभागृहात धूर करणार्‍यांपैकी एकाचे नाव सागर शर्मा असून त्याला खासदार कोटकांनी पकडलं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -