Saturday, May 4, 2024
Homeकोकणरत्नागिरीवेतन करारामुळे नाविकांचा झाला फायदा

वेतन करारामुळे नाविकांचा झाला फायदा

चिपळूण (प्रतिनिधी) : अंदमान आणि निकोबार बेटांवरील जहाजावरचे नाविक स्थानिक आहेत. नॅशनल युनियन ऑफ सीफेअर्स ऑफ इंडिया (न्यूसी)च्या वेतन करारामुळे आणि त्यांच्या कल्याणकारी उपक्रमांमुळे अंदमान आणि निकोबार बेटांमधील आमच्या सर्व नाविकांना आणि त्यांच्या कुटुंबांना संरक्षण आणि फायदा झाला आहे. असे न्युसिचे सरचिटणीस व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.

२८ ऑक्टोबर २०२२ रोजी न्यूसीमुळे एकदा मेनलँड आयलंड फ्लीट आणि फॉरशोअर फ्लीटमध्ये आणखी पाच वर्षासाठी ‘बहुमताची मान्यताप्राप्त युनियन’ म्हणून घोषित केली आहे. अनेक वर्षांनी नाविकांचे न्यूसीशी असलेल्या समर्पण, आणि विश्वासामुळे हे सर्व शक्य झाले आहे.

न्यूसीला यापूर्वी ५ वर्षांसाठी बहुमत देण्यात आले होते. धैर्याने आणि दृढनिश्चयाने २००८ ते २०१८ या कालावधीसाठी प्रलंबित असलेला सुधारित वेतन करार लागू केला होता. पोर्ट ब्लेअरची न्युसी शाखा ही मुख्य कार्यालयाच्या समन्वयाने सर्व प्रकारची मदत करीत आहे. न्यूसी ही महत्त्वाच्या क्षेत्रातील जहाजांवर सेवा करणाऱ्या नाविकांच्या हक्कांसाठी लढत आहे. न्यूसी आता अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्थानिक खलाशी व कुटुंबांच्या भल्यासाठी लवकरच पुन्हा भरघोस वेतन वाढीचा करार करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -