Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीसाताऱ्यात वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात, एकाचा मृत्यू, ३० जण जखमी

साताऱ्यात वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात, एकाचा मृत्यू, ३० जण जखमी

सातारा (हिं.स.) : कोल्हापूर येथून आळंदीस निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाचा शिरवळ येथे रविवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एक वारकरी ठार झाला असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात मायाप्पा कोंडीबा माने (४५, रा. भादोले, जि. कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच मारुती भैरुनाथ कोळी (४०, रा. लाहोटे, जि. कोल्हापूर) हे मृत्यूशी झुंज देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील पुणे थांब्याजवळ आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने असलेल्या आयशर टेम्पोने कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथील दिंडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमध्ये एक वारकरी ठार तर ३० वारकरी जखमी झाले आहेत. दुर्घटनेत ११ वारकरी किरकोळ जखमी झाले आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

असा झाला अपघात

अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले, लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी क्र. १ व ७ हा दिंडी सोहळा पंढरपूर पायी वारी करणेकरीता आळंदी ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळ्याकरीता आळंदी येथे ट्रॅक्टर (एमएच १० एवाय ५७०५) ट्रॉलीमधून प्रवास करीत होते. यावेळी सदरील ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडलेल्या होत्या. यामध्ये महिलांसह ४३ वारकरी आळंदीकरीता प्रवास करीत होते.

दरम्यान, ट्रॅक्टर ट्रॉली सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत आली असता पाठीमागून भाजी घेऊन पुण्याकडे भरधाव वेगात निघालेल्या आयशर टेम्पो (एमएच ४५ एएफ २२७७) वरील चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. तसेच महामार्गावरून दिंडी सोहळ्याकरीता निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की, धडकेनंतर टेम्पो महामार्गावर जोरदार पलटी होत ट्रॉलीमधील वारकरी महामार्गावर हवेत उडत गंभीर जखमी झाले तर ट्रॉलीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यावेळी ट्रॉलीमधील लोखंडी बार मायाप्पा माने व मारुती कोळी यांच्या पोटामध्ये घुसल्याने ते गंभीर जखमी झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -