Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीसिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधवला अटक

सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधवला अटक

तीन राज्यांच्या संयुक्त पथकाने गुजरातमधून अटक केली

पुणे (हिं.स.) : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात पुणे, पंजाब आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने संतोष जाधव आणि त्याचा साथीदार नवनाथ सूर्यवंशी याला गुजरातमधून अटक केली. या हत्येत संतोष जाधव याचाही सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी संतोष जाधव याला रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे सिद्धू मूसवाला खून प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींची ओळख पटली आहे. या खून प्रकरणात सौरभ महाकाळ याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

या हत्येशी संबंधित आरोपींना अटक करण्यासाठी विविध राज्यांचे पोलीस काम करत आहेत. संबंधित राज्यांचे पोलिसही पंजाब पोलिसांशी सतत संपर्कात आहेत. संतोष जाधवच्या चौकशीत महत्त्वाचे सुगावा मिळू शकतो असा पोलिसांचा विश्वास आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेला जाधव एका खुनाच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार होता. पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. मूसेवाला खून प्रकरणात नागनाथ सूर्यवंशी याचे नाव पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्यात २०२१ मध्ये हत्याकांडानंतर जाधवला आश्रय देणारा आरोपी सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ याला पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. मूसेवाला हत्येप्रकरणी दिल्ली पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या स्पेशल सेलने महाकाळची चौकशी केली आहे. सलीम खान आणि त्यांचा मुलगा सलमान खान यांना धमकीची पत्रे पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी महाकाळचीही चौकशी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -