साईनाथांचे पितळेंना चांदीचे तीन रुपये दान

Share

विलास खानोलकर

हरिश्चंद्र पितळे यांच्या फीट येणाऱ्या मुलाला बाबांच्या कृपेने बरे वाटले. साईनी सांगितले, “श्रद्धा, सबुरी व देवावर विश्वास ठेवा’’ त्याप्रमाणे आपला मुलगा बरा झाला म्हणून पितळे यांनी मिठाई वाटली. बाबांना दक्षिणा दिली. त्यांची बाबांवर भक्ती जडली. ते मुंबईस जाण्यास निघाले तेव्हा श्री बाबांनी त्यांना तीन रुपये दिले आणि म्हणाले, “मी तुला याआधी दोन रुपये दिले आहेत. आज हे आणखी तीन रुपये देतो. घरी गेल्यावर त्यांची पूजा कर. तुझे कल्याण होईल.’’ पितळेंनी ते रुपये घेतले. बाबांना वंदन करून ते मुंबईस निघाले.

परतीच्या प्रवासात त्यांच्या मनात आपण याआधी बाबांना कधीही भेटलो नाही, तरीही त्यांनी मला दोन रुपये दिल्याचे कसे सांगितले. हे एकच विचारचक्र चालू होते. त्यांनी अनेक तर्क लावले, पण उपयोग झाला नाही. घरी गेल्यावर त्यांनी आपल्या वृद्ध आईला शिर्डीतील सर्व वृत्तान्त सांगितला. त्या दोन रुपयांबद्दलही सांगितले. ते ऐकून ती म्हणाली, “तू लहान असताना तुझ्या वडिलांनी तुला अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनास नेले होते. त्यावेळी समर्थांनी त्यांना प्रसाद म्हणून दोन रुपये दिले व त्यांची पूजा करण्यास सांगितले. तुझे वडील त्या दोन रुपयांची नित्य पूजा करीत असत. ते स्वर्गवासी झाल्यानंतर घरातील मुले पूजाअर्चा करू लागली. त्या रुपयांची कोणी काळजी घेतली नाही. ते कुठे हरवले हेही माहीत नाही. पुढे त्यांची आठवणही राहिली नाही.

पण आता काळजी घे. साईंनी दिलेल्या तीन रुपयांची रोज पूजा कर. आपल्या घरात भक्तीचे व समृद्धीचे आगमन व्हावे म्हणूनच त्यांनी हा प्रसाद दिला आहे.’’ आईच्या बोलण्यातून पितळ्यांना बाबांच्या वचनातील सत्यार्थ उमगला. ते तीन रुपयांची नित्य पूजा करू लागले.

हरिश्चंद्र पुत्र पडे आजारी
गाव फिरूनी झाले बेजारी ।। १।।
औषधे करूनही अति आजारी
येई फिट जाई फिट ।। २।।
क्षणाक्षणात मृत्यूशी भेट
ऐकूनी दासगणूंचे कीर्तन ।। ३।।
केले साईनाथांचे
आवर्तन रोग्याचे झाले
पूर्ण परिवर्तन ।। ४।।
अन् फिट पुत्र झाला फिट
पितळेसूत झाला धडधाकट ।। ५।।
चांदीचे तीन रुपये दिले फटाफट
साई म्हणे आधीच
दोन दिले झटपट ।। ६।।
कल्याण होईल निघ सटासट
वृद्ध आईने सांगितले वट ।। ७।।
पित्याला समर्थांनी दिले रुपे दोन
पुजाकर ठेवूनी गुलाल द्रोण ।। ८।।
हरवले ते दोन, विसरू नको हे तीन
साई करेल कल्याण
पिढ्या तीन ।। ९।।
श्रद्धा, सबुरी, शांततेत कल्याण
साई म्हणे १० पिढ्याचे हाईल कल्याण।। १०।।

vilaskhanolkardo@gmail.com

Recent Posts

महापालिका सफाई कर्मचारी सुनील कुंभार यांनी सापडलेले १५ तोळे सोने दिले पोलिसांकडे!

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केला कुंभार यांचा सत्कार मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका…

23 mins ago

Licence : २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास मुंबईत वाहन परवाना चाचण्यांच्या वेळेत बदल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातले मतदान उद्या होत असल्यामुळे वाहन चालनाच्या कोणत्याही प्रकारच्या…

35 mins ago

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे निधन

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे त्यांच्या…

1 hour ago

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…

2 hours ago

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…

2 hours ago

UPSC : युपीएससी परीक्षार्थींना दररोज ३००० रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…

3 hours ago