Saif and Kareena : स्टारकिड्सबाबत प्रश्नावर सैफ आणि करीना भडकले! म्हणाले, ‘आम्ही मुलांना जन्म देतो, पण…

Share

त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा

मुंबई : बॉलिवूडच्या नेहमीच चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी (Bollywood couples) एक म्हणजे सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूरची (Kareena Kapoor Khan) जोडी. तैमूर (Taimur) आणि जेह (Jeh) या त्यांच्या मुलांचीही सोशल मीडियावर (Social Media) कायम चर्चा होत असते. त्यांचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज पापाराझी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि ते काही मिनिटांतच व्हायरल होतात. यासंबंधीच सैफ आणि करिना यांना नुकताच एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तराने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

तुमच्या आडनावाचा तुमच्या करिअरवर परिणाम होतो का? असा प्रश्न अनुपमा चोप्रा यांनी सैफ अली खान आणि करिनाला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना सैफ म्हणाला, “प्रेक्षक हे स्टारकिड्समध्ये (Starkids) खूप इंटरेस्टेड असतात. स्टारकिड्सचे लोक सतत फोटो काढत असतात.”

पुढे करिना म्हणाली, “तैमूर हा एकदा तायक्वांदोसाठी गेला होता. तिथे लोक त्याचे फोटो काढत होते, इंटरनेटवर त्याचे रील शेअर केले जात होते. आम्हाला असे अटेंशन नको आहे. आम्ही स्टारकिड्स बनवत नाही. आम्ही मुलांना जन्म देतो. पण प्रेस, फोटोग्राफर्स आणि जनता त्या मुलांना ‘स्टारकिड्स’ बनवतात. जनतेला कदाचित निष्पापपणे फक्त स्टारकिड्स बघायचे असतात.”

सैफ म्हणाला, “फक्त प्रसिद्ध आडनाव असल्याने तुम्ही टॅलेंटेड होऊ शकत नाही.” त्याने तैमूरबाबत सांगितलं की, “तैमूरला अर्जेंटिनाचा लीड गिटारवादक किंवा फुटबॉलपटू व्हायचे आहे. त्याला अर्जेंटिनाला जायचे आहे जेणेकरून तो फुटबॉलपटू बनू शकेल.” त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Recent Posts

केजरीवालांची स्टंटबाजी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…

2 hours ago

श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे

सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…

2 hours ago

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

3 hours ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

5 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

6 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

6 hours ago