Tuesday, May 14, 2024
Homeअध्यात्मसाईचरण व्याघ्रशरण

साईचरण व्याघ्रशरण

विलास खानोलकर

एके दिवशी शिर्डीत एक मोठी गाडी आली. त्या गाडीत साखळदंडाने जखडलेला एक वाघ होता. तीन दरवेशी त्याचे मालक होते. गावोगावी वाघाचे खेळ करून ते आपला उदरनिर्वाह चालवीत असत. हा वाघच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होता. काही दिवसांनी या वाघाला कसलीशी व्याधी जडली. औषधोपचार करूनही गुण येईना. दरवेशी हतबल झाले. त्यांचे उत्पन्न बुडू लागले. त्यांनी श्रीबाबांची कीर्ती ऐकली होती. त्यांच्या कृपाप्रसादाने वाघाची व्याधी दूर होईल, या अपेक्षेने ते शिर्डीस आले होते. त्या दरवेशांनी मशिदीत जाऊन श्रीबाबांचे दर्शन घेतले आणि वाघाच्या व्याधीविषयी सांगितले. मग त्यांच्या आज्ञेवरून ते वाघाला घेऊन आले. त्या वाघाने साईनाथांना डोळे भरून पाहिले. आपली शेपटी तीन वेळा जमिनीवर आपटली. मोठ्याने
एक डरकाळी फोडली आणि श्री बाबांच्या पावनचरणी शांतपणे देह ठेवला. संतचरणी जो देह ठेवतो त्याचा उद्धार होतो.

साई डोळे मिटूनी बैसले समाधी, दिवास्वप्नात आले शंकरपार्वती आधी ।। १।।
साक्षात व्याघ्रेश्वरी भगवती स्वप्नी आली, संतश्रेष्ठ माझा वाघ शरण येईल सकाळी ।।२।।
येईल शरण फोडूनी डरकाळी, प्रसन्न स्वर्ग दाखवा पहाटे सकाळी ।। ३।।
दिवसा दरवेश घेऊनी आले साखळी, पिंजरा, व्याघ्र प्रचंड फोडे डरकाळी ।। ४।।
दरवेश शरण आले साई चरणी विनवि, द्यावी व्याघ्रमुक्ती तवचरणी ।। ५।।
महाप्रचंड जरी व्याघ्र तो आजारी, ताकद शंभर
मल्लाहुनी भारी ।। ६।।
साई विनवी सोडा त्यास सत्वरी, ईश्वरी ताकद सर्वाहूनी भारी ।। ७।।
उघडता पिंजरा बाहेर पडला वाघ, क्रोधिष्ट नजर सर्वत्रच वाघ ।। ८।।
दोन पायावरी राही उभा वाघ, भक्ष्यावरी झडपघेण्या तयार वाघ ।। ९।।
प्रेमळ नजरा नजर होता साई, वाघा कळती हीच भगवती आई
।। १०।।
भुईवरी तीन वेळा शेपटी आपटी, नमस्कार करूनी लोळण भुईसपाटी ।।११।।
शरण शरण शरण साईचरण, क्षण हाच वाट पाही येण्या मरण ।।१२।।
जग फिरुन आलो सारे जंगल, साई साई साई करा आता मंगल ।। १३।।
सत्वर दावा स्वर्गाचा रस्ता मंगल, साईराजा आयुष्यभर केली मी महादंगल ।। १४।।
किती असे मी सर्वाहूनी क्रूर, साई तुम्ही सर्वात अति शूर ।।१५।।
अति प्रेमाने जिंकलेत अनेक नरवीर, कीर्ती तुमची पसरली दूरदूर ।। १६।।
मरणसमई गातो मी साई गाथा, शरण मी आलो आता साई नाथा ।। १७।।
८१ योनी फिरूनी झालो मी वाघ, शूरवीर मी जगात होतो बेलाघ ।। १८।।
साई म्हणे हो आता शांतशांत, नको करू आता बिलकुल आकांत ।। १९।।
उदी लावूनी आशीर्वाद देई साई, भगवती व्याघ्र एकरूप
होई साई ।। २०।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -