Saturday, May 4, 2024
Homeअध्यात्मसाई निर्वाण माहिती

साई निर्वाण माहिती

साईनिर्वाणाची कथा सर्वांना माहीत आहे म्हणून त्यातील फक्त काही महत्त्वाच्या घडामोडींचा येथे विचार करत आहोत.
१) साईनिर्वाण : १५/१०/१९१८. वेळ : २.३५ मी.
२) २८ सप्टेंबरपासून बाबांना ताप आला.
३) सकाळी ९ किंवा १० चा दरम्यान वीट दुभंगली.
४) बायजा बाईंच्या अंगावर प्राण सोडले.
५) नानासाहेबांनी पाण्याच्या झारीने पाणी पाजले, पण पाणी बाहेर आले. त्यासरशी देवा म्हणून मोठ्याने किंचाळी मारली.
६) हिंदू-मुस्लीम वाद झाला. हिंदू म्हणायचे, बाबांना वाड्यात त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे समाधी द्या, तर मुस्लीम त्यांना बाहेर समाधीस्त करून थडके बांधून आम्ही व्यवस्था पाहू.
७) काही हिंदू म्हणत बाबांनी देह द्वारकामाईत ठेवला तेथेच समाधी बांधा.
८) नगरहून काकासाहेबांनी कलेक्टर बोलावले.
९) सर्वांनी आपले मत कागदावर लिहावे, ज्यांचे जास्त त्याप्रमाणे निर्णय होईल. म्हणून रामचंद्र कोतेंनी कंबर कसली व गावातून वाड्यात समाधी द्यावी यासाठी २००० मते मिळाली व प्रती पक्षाला ५००/६०० च मते मिळाली आणि बाबांचा देह वाड्यात ठेवावा, असा ठराव मंजूर झाला.
१०) त्यानंतर उपासनी महाराजांनी सशास्त्र पद्धतीने साई बाबांचा सर्व अंतिम संस्कार विधी पार पाडला.
११) २७ ऑक्टो. १९१८ ला तेरावे बापुसाहेब जोग व उपासनी महाराज यांनी गंगेसारख्या पवित्र ठिकाणी केले. त्यासाठी भंडारा वर्गणी २४०० रुपये जमली.
१२) बाबांनंतर त्यांच्या सर्व वस्तू ज्यांची किंमत १०,००० चा आसपास होती ते जतन करायला शिर्डी ट्रस्टची स्थापना झाली.
१३) पहिले वर्षश्राद्ध काशीमध्ये उपासनी बाबानी व बापुसाहेब जोग यांनी केले. तेथे मोठ्या स्वरूपात अन्नदान, गोदान, सब्राम्हण दक्षिणा देऊन हा सोहळा पार पडला.

– विलास खानोलकर

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -