Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीSiddhivinayak Temple Trust : आदेश बांदेकरांना हटवून शिवसेनेचे सदा सरवणकर सिद्धीविनायकाच्या अध्यक्षपदी

Siddhivinayak Temple Trust : आदेश बांदेकरांना हटवून शिवसेनेचे सदा सरवणकर सिद्धीविनायकाच्या अध्यक्षपदी

मुंबई : सिद्धिविनायक मंदिर न्यास (Siddhivinayak Temple Trust) अध्यक्षपदी शिवसेना (Shiv Sena) माहिम दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) या समितीचे अध्यक्ष होते. मात्र, आज शिवसेनेच्या सदा सरवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सरवणकरांकडे मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं बोललं जात होतं. अनेक दिवसांपासून तर्कवितर्कही लावले जात होते. अशातच आज सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. शिवसेनेत असताना सरवणकरांनी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. माहिम, दादरचा विभाग शिवसेनेकडे राखून ठेवण्याचं काम सदा सरवणकरांनी केलं आहे. तसेच, सरवणकर सुरुवातीला नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर सरवणकरांनी शिवसेनेकडूनच आमदारकीची निवडणूक लढवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकरांनी ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) कास धरली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -