Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाMatch fixing: क्रिकेट जगताला धक्का, मॅच फिक्सिंग प्रकरणात या माजी क्रिकेटरला अटक

Match fixing: क्रिकेट जगताला धक्का, मॅच फिक्सिंग प्रकरणात या माजी क्रिकेटरला अटक

नवी दिल्ली : श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू सचित्रा सेनानायके (sachitra senanayke) याला मॅच फिक्सिंगच्या (match fixing) आरोपात अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन क्रिकेट जगतासाठी ही धक्कादायक बातमी आहे. कोलंबो पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. सेनानायकेने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्याचे म्हणणे होते की त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

खेळाडूंना प्रवृत्त केल्याचा आरोप

श्रीलंकेसाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या सेनानायकेवर २०२०मध्ये लंका प्रीमियर लीगदरम्यान मॅच फिक्स केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्याने दोन खेळाडूंना मॅच फिक्स करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप होता. कोर्टाने तीन आठवड्याआधी सेनानायकेला परदेशी जाण्यावर बंदी घातली होती.

श्रीलंकेसाठी ४९ वनडेत केलेय प्रतिनिधित्व

३८ वर्षीय सेनानायकेने २०१२ ते २०१६ या दरम्यान श्रीलंकेसाठी ४९ वनडे आणि २४ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. सेनानायकेने वनडेत ५३ तर टी-२० मध्ये २५ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी ८ सामने खेळले आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान या संघाचा मालक आहे.

सेनानायकेचा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने ११२ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ५६७ विकेट घेतल्यात तर १८६ लिस्ट ए सामन्यांमध्ये या खेळाडूच्या नावावर २८३ धावा आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ९ विकेट आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -