Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीअजमेरमध्ये साबरमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर, एकाच रूळावर आल्या दोन्ही रेल्वे

अजमेरमध्ये साबरमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर, एकाच रूळावर आल्या दोन्ही रेल्वे

अजमेर: राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात एक रेल्वे आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली. यानंतर एकच गोंधळ झाला. साबरमती आगरा कँट सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात अजमेर येथील मदार रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात घडला.

हा अपघात इतका भीषण होता की साबरमती आगरा कँट सुपरफास्ट एक्सप्रेसचे इंजिनसह ४ डबे रूळावरून घसरले. हा अपघात रात्री एक वाजून १० मिनिटांच्या सुमारास झाला. यावेळी मदार स्टेशनजवळ मालगाडी आणि एक्सप्रेस ट्रेन एकाच रूळावर आल्या.

यानंतर ट्रेनच्या लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला मात्र साबरमती एक्सप्रेसची टक्कर मालगाडीशी झाली. या अपघातावेळेस ट्रेनमध्ये हजारोंच्या संख्येने प्रवासी होते. ट्रेन रूळावरूनर घसरल्यानंतर खूप दूर झाली आणि विजेचा खांबाला धडकली. यानंतर काही वेळाने रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. दरम्यान, या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

रात्री उशिरा झाला अपघात

रात्री १२.५५ मिनिटांच्या सुमारास ही रेल्वे अजमेर रेल्वे स्टेशनवरून निघाली आणि काही किमी गेल्यानंतर हा अपघात झाला. अपघाच्या वेळेस रेल्वेत बसलेल्या लोकांना जबरदस्त झटका बसला. जागेवर झोपलेली मुले, महिला आणि वयस्कर व्यक्ती सीटवरून खाली पडल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -