Saturday, May 18, 2024
HomeदेशS Jaishankar : आता केवळ काही देशांचाच अजेंडा चालणार नाही - एस....

S Jaishankar : आता केवळ काही देशांचाच अजेंडा चालणार नाही – एस. जयशंकर

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) यांनी अतिशय मुद्देसूदपणे भारताची बाजू मांडली आहे. त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात करताना म्हटले, भारताकडून नमस्कार! यानंतर ते म्हणाले , कोरोना काळानंतर जगासमोर अनेक आव्हाने आली आहेत. विकसित देशांवर सर्वाधिक दबाव आहे. विश्वासाची पुर्ननिर्मिती आणि जागतिक एकजूट पुन्हा एकदा जागवण्यासाठी यूएनजीएच्या विषयाला आमचे पूर्ण समर्थन आहे.

यावेळी जयशंकर यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षतेबाबत कौतुक केले. कौतुक करताना ते म्हणाले की आफ्रीकन युनियन जी-२० संघटनेचा भाग बनला हे भारताचे यश आहे. प्रत्येक संकटकाळात भारताने पुढे होत मदत केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी नाव न घेता कॅनडावर टीका केली. राजकीय सुविधेची मदत घेत दहशतवादावर कारवाई योग्य नाही. सार्वभौमत्वाची काळजी घेतली गेली पाहिजे.

याशिवाय आपल्या भाषणात त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बदलाबाबत भारताने केलेल्या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला. ते म्हणाले, काळ बदलत आहे, आता दुसऱ्या देशांचे ऐकावे लागेल. फक्त काही देशांचाच अजेंडा जगावर थोपवला जाऊ शकत नाही. एखादा देश अजेंडा ठरवेल आणि दुसरे देश त्याच्यासोबत जातील हे दिवस संपेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -