Sunday, May 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपुतिन-किम जोंग यांच्यात सीक्रेट मीटिंग! उत्तर कोरियावरून रशियासाठी रवाना झाली स्पेशल ट्रेन

पुतिन-किम जोंग यांच्यात सीक्रेट मीटिंग! उत्तर कोरियावरून रशियासाठी रवाना झाली स्पेशल ट्रेन

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) आणि उत्तर कोरियाचे किम जोंग (kim jong un) यांच्या भेटीबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता दोन्ही देशांनी पुतिन आणि किम यांच्या लवकरच भेटीबाबत दुजोरा दिला आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग लवकरच रशियाला जाणार आहेत तेथे ते राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतील. या भेटीमुळे पाश्चिमात्य देशांची चिंता वाढली आहे.

रशियाचे राष्ट्रपती कार्यालय क्रेमिलनने वेबसाईट केलेले विधानात म्हटले की पुतीनच्या निमंत्रणावरून किम जोंग उन रशियाला येतील आणि या भेटीगाठी आगामी दिवसांत होतील. उत्तर कोरियाच्या सरकारी न्यूज एजन्सी केसीएनएनेही किम जोंग आणि पुतीन यांच्या भेटीला दुजोरा दिला आहे.

रशियासाठी रवाना होणार किम जोंग?

असोसिएट प्रेसच्या काही पत्रकारांनी उत्तर कोरिया-रशियाच्या सीमेजवळील एका स्टेशनवर किम जोंग उन यांची स्पेशल ट्रेन पाहिली. हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या या ट्रेनचा वापर किम जोंग परदेशी दोऱ्यांसाठी करतात. दरम्ययान या ट्रेनमध्ये किम जोंग होते की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

मंगळवारी पुतिनला भेटणार किम जोंग?

जपानच्या क्योदो न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार किम जोंग ट्रेनने रशियाला जाण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या गुप्तहेर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली होती की किम जोंग उन आणि पुतिन यांच्यात या महिन्यात चर्चा होऊ शकते.

रशिया-उत्तर कोरियामध्ये वाढली जवळीक

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अधिकारी जॉन किर्बी यांनी ३० ऑगस्टला सांगितले होते की रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यात हत्यारांवरून बोलणे पुढे सरकत आहे. कारण पुतिन यांना आपले वॉर मशीन वाढवायचे आहे. युक्रेन युद्धामुळे रशियावर अनेक प्रकारची बंदी आहे. याच कारणामुळे हत्यारांसाठी रशिया उत्तर कोरियाशी हातमिळवणी करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -