Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीJr NTR : आरआरआर फेम ज्युनियर एनटीआरने अनुभवले जपानमधले भूकंपाचे धक्के!

Jr NTR : आरआरआर फेम ज्युनियर एनटीआरने अनुभवले जपानमधले भूकंपाचे धक्के!

थरारक अनुभव ट्वीट करत म्हणाला…

मुंबई : नववर्षाचं स्वागत (Welcome new year) करण्यासाठी आणि सुट्टीत निवांत वेळ घालवण्यासाठी अनेकजण इतर देशांमध्ये फिरायला जातात. आरआरआर (RRR) फेम भारतीय अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) देखील असाच आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी जपानमध्ये (Japan) गेला होता. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के (Earthquake)जाणवले. यावेळी ज्युनिअर एनटीआर तिथेच होता आणि त्याने हे भूकंपाचे धक्के अनुभवले. सध्या तो सुखरुप भारतात परतला असून ट्वीट (Tweet) करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.

ज्युनियर एनटीआर गेल्या आठवड्यात तो आपल्या कुटुंबियांसोबत जपानला गेला होता. मात्र जपानमध्ये भूकंप आल्याने त्याला भारतात परतावं लागलं. त्याने ट्वीट केलं आहे की, “जपानहून आज भारतात घरी परतलो आहे. तिथे आलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे मलादेखील धक्का बसला आहे. आठवडाभर मी जपानमध्ये होतो. या भूकंपाचा धक्का बसलेल्या प्रत्येकासाठी मला वाईट वाटत आहे. तुम्ही सर्व ज्या बहादुरीने या संकटाचा सामना करत आहात त्याबद्दल अप्रुप वाटतं. लवकरच सर्व काही ठीक होईल. स्टे स्ट्राँग, जपान”, अशा भावना त्याने या ट्वीटमधून व्यक्त केल्या आहेत.

ज्युनियर एनटीआर नेहमीच त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसतो. अनेकदा तो देशाबाहेर जातो. नववर्षाच्या स्वागतासाठी तो पत्नी, लक्ष्मी प्रणती आणि अभय, भार्गव या दोन मुलांसह जपानला गेला होता. तो जेव्हा भारतात परत आला तेव्हा जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामीची मोठी घटना घडली. त्यामुळे ज्युनियर एनटीआर या नैसर्गिक आपत्तीपासून (Natural calamity) थोडक्यात बचावला आहे.

दरम्यान, भूकंप आणि त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर, जपानच्या किनारी भागात राहणाऱ्या लोकांना तात्काळ सुरक्षितस्थळी शिफ्ट होण्यास सांगितलं होते. यामध्ये उंचच उंच इमारतींमध्ये आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जॅपनिज पब्लिक ब्रॉडकास्टरनं माहिती दिली की, जास्तीत जास्त २१ भूकंपाचे धक्के जाणवल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत आठ जणांचा भूकंपामुळे मृत्यू झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -