Home ब्रेकिंग न्यूज BMC : महापालिकेचे नगरसेवक निघणार बीडच्या जंगल सफारीवर

BMC : महापालिकेचे नगरसेवक निघणार बीडच्या जंगल सफारीवर

0
BMC : महापालिकेचे नगरसेवक निघणार बीडच्या जंगल सफारीवर

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

BMC : उबाठाच्या पक्षतोड, वृक्षतोडच्या आरोपांचा समाचार सभागृहनेते गणेश खणकर यांनी घेत मध्य वैतरणा धरणाच्या बांधकामासाठी तोडलेल्या १.७५ लाख झाडांच्या बदल्यात बीड जिल्ह्यात ५४० हेक्टर क्षेत्रावर लावलेल्या २ लाख झाडांची सद्यस्थिती तपासा अशीच मागणी प्रशासनाला केली आहे. तसेच वृक्ष प्राधिकरण समितीच्या सर्व सदस्यांचा पाहणी दौरा आयोजित करण्याची मागणी गणेश खणकर यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेचे वृक्षप्राधिकरणाचे सदस्य हे बीड येथील जंगल सफारीवर जाणार असून याठिकाणी प्राणी नव्हेतर चक्क महापालिकेच्या पैशांमधून लावलेल्या प्रत्येक झाडांची पाहणी करणार आहे. त्यामुळे उबाठाच्या काळात झाडांची कत्तल केल्यानंतर जंगल बहरले की झाडे लावण्याच्या नावाखाली स्वत:ची तिजोरी भरली याचा लेखाजोखाच या सफारीतून मांडला जाणार आहे.

मध्य वैतरणा धरणाच्या बांधकामासाठी सन २००९ मध्ये जव्हार परिसरातील सुमारे १.७५ लाख झाडे तोडण्यात आली होती. या झाडांच्या बदल्यात बीड जिल्ह्यातील ५४० हेक्टर क्षेत्रावर २ लाख झाडे लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. या वृक्षलागवडीसाठी मुंबई महानगरपालिकेने सुमारे ९० लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला होता. मात्र, या वृक्षलागवडीचे पुढे काय झाले? लावलेली किती झाडे जगली आहेत का? आणि सध्याची त्यांची नेमकी स्थिती काय आहे, याची वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत सभागृह नेते तथा वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य गणेश खणकर यांनी मांडले.

https://www.prahaar.in/2026/11/28/are-krishna-vatika-road-and-sai-marg-in-goregaon-no-hawking-zones-standing-committee-chairperson-orders-immediate-and-sustained-enforcement-action/

या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यातील संबंधित २ लाख वृक्ष लागवड केलेल्या क्षेत्राचा प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करावा. या दौऱ्यामध्ये वृक्ष प्राधिकरण समितीच्या सर्व सदस्यांचा समावेश करून वृक्ष लागवडीची सद्यस्थिती, झाडांचे अस्तित्व आणि संवर्धनासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घ्यावा, अशी मागणी आज बृहन्मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत सभागृह नेते तथा वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य गणेश खणकर यांनी केली.

विकासकामांना विरोध करणे हा काही विरोधकांचा नेहमीचाच दृष्टिकोन असतो. मात्र, शहराच्या विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्षसंवर्धन यांचाही समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ वृक्षतोडीला विरोध करून चालणार नाही, तर पर्यायी वृक्षलागवडीसाठी महापालिकेने खर्च केलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला आहे का, प्रत्यक्षात किती झाडे जगली आहेत आणि त्यांचे संवर्धन व्यवस्थित झाले आहे का, याचीही तपासणी झाली पाहिजे, असे स्पष्ट मत गणेश खणकर यांनी मांडले. सार्वजनिक पैशातून करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. त्यामुळे समितीच्या सर्व सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात सहभागी होऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी गणेश खणकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here