Home महामुंबई गोरेगावमधील कृष्णवाटिका रोड, साई मार्ग ना फेरीवाला क्षेत्र? स्थायी समिती अध्यक्षांनी तातडीने सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे दिले आदेश

गोरेगावमधील कृष्णवाटिका रोड, साई मार्ग ना फेरीवाला क्षेत्र? स्थायी समिती अध्यक्षांनी तातडीने सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे दिले आदेश

0
गोरेगावमधील कृष्णवाटिका रोड, साई मार्ग ना फेरीवाला क्षेत्र? स्थायी समिती अध्यक्षांनी तातडीने सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे दिले आदेश

गोरेगाव पूर्व येथील साई मार्ग आणि कृष्णवाटिका मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे, त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली असताना येथील फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे या समस्येत अधिक भर पडल्याची चिंता स्थानिक नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे दोन्ही रस्ते ना फेरीवाला क्षेत्र म्हणून तात्काळ जाहीर करण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांची असल्यामुळे याठिकाणी तातडीने कारवाई केली जावी तसेच येथील कारवाई ही सातत्यपूर्ण राहावी असे निर्देश महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला दिले

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये भाजपच्या प्रिती सातम यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे गोरेगाव पूर्व येथील साई मार्ग आणि कृष्णवाटिका मार्गावरील फेरीवाल्यांच्या वाढत्या समस्येमुळे स्थानिक नागरिक त्रस्त असल्याची कैफियत हरकतीच्या मुद्दयाद्वारे मांडली. अनुज्ञापन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे विभागात वाहतूक कोंडीची निर्माण होत असल्याचा हरकतीचा मुद्दा उपस्थित करत सातम यांनी दोन मिनिटाच्या प्रवासासाठी नागरिकांना पाऊण तास तिष्ठत राहावे लागत असल्याचे सांगितले. दिडोंशी न्यायालयाच्या समोरच्या बाजुला असलेल्या या रस्त्यांवर कृष्णवाटिका आणि साईमार्ग या दोन्ही रस्त्यांचे सिमेंटीकरण सुरु आहे. दुसरीकडे गोरेगाव मुलुंड लिंक रोडचे काम सुुर आहे. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली असलेली असतानाच साई मार्ग आणि कृष्णवाटिका मार्गावर चक्क फैरीवाल्यांनी रस्त्यांवरच व्यावसाय थाटले आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/28/surprise-inspection-of-swimming-pools-in-dadar-and-chembur-by-the-chairperson-of-the-women-and-child-welfare-committee/

मात्र येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाचे अनुज्ञापन (परवाना) विभाग अपयशी ठरत असून कारवाईपूर्वीच फेरीवाल्यांना वाहनाच्या चालकांकडून माहिती दिली जाते. त्यामुळे फेरीवाल्यांवरील कारवाईची नोटंकी सुरु असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून विभागांत नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एका बाजुला पदपथ मोकळे करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण पदपथ मोकळे करताना हे फेरीवाले चक्क रस्त्यावर व्यवसाय थाटून बसल्याने वाहनांचाही रस्ता अडवून बसले आहेत. त्यामुळे प्रभागातील सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई करता येत नसली तरी कृष्णवाटिका मार्ग आणि साई मार्ग हे दोन्ही रस्ते हे ना फेरीवाले क्षेत्र म्हणून जाहीर करा किंवा कायमस्वरुपी कारवाई केली जावी. कोणत्याही परिस्थितीत याठिकाणी फेरीवाल्यांना बसायला देवू नये. कारण रस्तेही जर या फेरीवाल्यांनी अडवले तर आधीच वाहतूक कोंडीत अडकून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पुढे या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचाही फटका बसतो. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कायमस्वरुपी हटवण्यात यावे अशी मागणी सातम यांनी केली. यावर अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तातडीने पुन्हा पुन्हा कारवाई केली जावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here