Home महामुंबई दादर व चेंबूर येथील जलतरण तलावांची महिला – बालकल्याण समिती अध्यक्षांची अचानक पाहणी

दादर व चेंबूर येथील जलतरण तलावांची महिला – बालकल्याण समिती अध्यक्षांची अचानक पाहणी

0
दादर व चेंबूर येथील जलतरण तलावांची महिला – बालकल्याण समिती अध्यक्षांची अचानक पाहणी

दादर (पश्चिम) आणि चेंबूर येथील महानगरपालिका जलतरण तलावांना बुधवारी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल संजय तुर्डे यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थापन, देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. या पाहणी दरम्यान जलतरण तलावांच्या दैनंदिन कामकाजात तसेच आवश्यक सुविधांच्या उपलब्धतेबाबत सुधारणा करण्याचे निर्देश तुर्डे यांनी दिले. जलतरण तलावांच्या निर्धारित नियमांनुसार आवश्यक संख्येने लाइफगार्ड उपस्थित असणे, फिल्टरेशन प्लांट नियमितपणे कार्यरत ठेवणे, तसेच आवश्यक सुरक्षा साधनसामग्री उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या सुविधांकडे अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देशही तुर्डे यांनी दिले.

यावेळी संबंधित कंत्राटदारांच्या कामकाजाचा तसेच जलतरण तलावांच्या देखभाल व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असून, कंत्राटदारांनी निर्धारित अटी व नियमांचे पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, जलतरण तलावांमधील क्लोरीनेशन प्रक्रियेसाठी नियुक्त कंपनीच्या कामकाजाची सखोल तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करावी. संबंधित कामकाजात नियमांचे उल्लंघन किंवा निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला सूचित केले.

https://www.prahaar.in/2026/11/28/indian-railways-ticket-transfer-rules-confirmed-tickets-can-be-transferred-to-the-names-of-family-members/#google_vignette

महानगरपालिकेच्या जलतरण तलावांमध्ये येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी लाइफगार्डची पुरेशी उपलब्धता, फिल्टरेशन यंत्रणेचे नियमित कार्यान्वयन, पाण्याची गुणवत्ता आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना यांची नियमित तपासणी करावी, असेही मीनल संजय तुर्डे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here