सरकारच्या अत्यावश्यक कामकाजासाठी सभागृहे पुन्हा बोलावण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आली. प्रस्तावानुसार, लोकसभेचे अधिवेशन 30 नोव्हेंबर 2026 रोजी, तर राज्यसभेचे अधिवेशन 2 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. 3 डिसेंबर रोजी दोन्ही सभागृहांचे कामकाज संपण्याची शक्यता आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत स्पष्ट केले की, ही बैठक संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचाच पुढील भाग आहे. मात्र, सभागृहातील कामकाजाच्या गरजांनुसार या कार्यक्रमात बदल होऊ शकतो. या विशेष कामकाजात ‘सीमांकन विधेयक, 2026’ (Delimitation Bill, 2026) आणि ‘घटना (131 वी दुरुस्ती) विधेयक, 2026’ यांसारख्या महत्त्वाच्या विधेयकांवर भर दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
The Government has requested Hon’ble Speaker, Lok Sabha and Hon’ble Chairman, Rajya Sabha to reconvene Lok Sabha on Monday, 30th November, 2026 and Rajya Sabha on Wednesday, 2nd December, 2026 respectively to transact essential Government Business. Subject to exigencies of the Business, the sitting of both Houses may conclude on 3rd December, 2026.
— Kiren Rijiju (@KirenRijiju) November 26, 2026
संसदेची प्रस्तावित बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा सरकारच्या परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षण लागू करण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधानांनी मंत्र्यांना आगामी संसदीय बैठकीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. महिला आरक्षणाला मतदारसंघांच्या परिसीमन प्रक्रियेशी जोडणारे संविधान दुरुस्ती विधेयक यंदा 17 एप्रिल रोजी आयोजित विशेष अधिवेशनात लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. या विधेयकाला आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळाले नव्हते. विधेयक नामंजूर झाल्यानंतर देशात परिसीमन प्रक्रिया आणि लोकसभेतील सदस्यसंख्या वाढवण्याच्या मुद्द्यावर चर्चा अधिक तीव्र झाली होती.
बातमी अपडेट होत आहे.